महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने राजकीय अन्वयार्थ सांगणारे फलक जाहिरातीचे फलक तत्काळ जप्त करून ताब्यात घेण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. यादृष्टीने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सातारा शहरातील फ्लेक्स तातडीने हटवण्यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध केली होती. मुख्याधिकारी बापट यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकास विभागाच्या वतीने सातारा शहरात पोवई नाका, राजवाडा, पंताचा गोट, सेव्हन स्टार परिसर येथे फ्लेक्स जप्तीची मोहीम राबवण्यात आली.
सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सात या दरम्यान तब्बल 40 फ्लेक्स जप्त करण्यात आले. काही जाहिराती या आच्छादित करण्यात आल्या असून सातारा शहर बर्यापैकी फ्लेक्समुक्त झाले आहे. येथून पुढे तीन दिवस ही मोहीम अशी सुरू राहणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले.सातारा पालिकेकडून 40 फ्लेक्स जप्तीची मोहीम
दोषींकडून वसूल केला जाणार दंड
by Team Satara Today | published on : 16 October 2024

सातारा : सातारा शहरात सातारा पालिकेच्या
अतिक्रमण हटाव विभागाने सातारा शहरातील तब्बल 40 फलक निवडणूक
आयोगाच्या निर्देशाप्रमाणे हटवले आहेत. बेकायदेशीररित्या फ्लेक्स लावणार्यांना
दहा हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख
प्रशांत निकम यांनी दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा