मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा   : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.

जिल्हयातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर आपल्या कार्यालयामध्ये कार्यरत पुरुष, स्त्री मनुष्यबळाची डिसेंबर 2025 अखेरची माहिती तिमाही विवरणपत्र (ईआर-1) आपला युजर आयडी व पासवर्डच्याद्वारे दि. 1 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन सादर करावी. या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा येथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र, सातारचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी युती, प्रबळ उमेदवारांचा शोध; राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यात मोर्चे बांधणी
पुढील बातमी
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

संबंधित बातम्या