सातारा : तालुक्यातील कळंबे येथे दि २७ डिसेंबर रोजी भाजी पाला विक्री व्यवसाय करणारे विजय नामदेव इंदलकर (वय ५०) यांच्या घरासमोरील अंगणात त्यांच्यासह पत्नी आणि मुलगा प्रतीक यांना तू या जागेत घर बांधायचे नाही, ती जागा आमचीच आहे, असे म्हणून फिर्यादी विजय इंदलकर आणि त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने पाठीवर, डोक्यात मारहाण करण्यात आली.
मारहाण करून पत्नी आणि मुलाला शिवीगाळ दमदाटी करून हाताने धक्काबुक्की देखील करण्यात आली. याप्रकरणी विश्वास मारुती इंदलकर, शशिकला मारुती इंदलकर, रेश्मा विश्वास इंदलकर,मंगल वसंत इंदलकर, शैलेश वसंत इंदलकर, सुलोचना सुदाम इंदलकर,विकास सुदाम इंदलकर, ईश्वरी विकास इंदलकर (सर्व रा. कळंबे, ता. सातारा) यांच्या विरोधात गर्दी जमून मारामारी केल्याप्रकरणी विकास इंदलकर यांनी फिर्याद दिल्याने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कुंभार करत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांनी दिली आहे.