सातारा : सातारा पालिकेसमोरुन अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा नगरपालिकेसमोरुन अज्ञात चोरट्याने एमएच 11 डीआर 2981 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 10 मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी राजेश गणेश वंजारी (वय 39, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवा. मोरे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा