पोक्सो प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 June 2025


सातारा : पोक्सो प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2023 पासून ते 7 जून 2025 दरम्यान सातारा शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या डोक्याला पिस्तुलासारखे हत्यार लावून धमकी, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी सुशांत सुभाष पवार आणि त्याची आई रा. शाहूनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; तीन जण जखमी
पुढील बातमी
धमकी, दमदाटी प्रकरणी एकाविरोधात तक्रार

संबंधित बातम्या