सातारा : खावली, ता. सातारा येथील घनशाम बिअर शॉपी दुकानाजवळ पाठीमागून कारची धडक बसल्याने रिक्षाचालक जखमी झाला.
रिक्षाचालक वसंत दासू गवळी (वय 47, रा. जिंती नका, मलटण, ता. फलटण) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कारचालक (एमएच 42 बीबी 7898) ध्वज प्रवीण महामुनी (वय 36, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत.