सातारा : सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक सुनील काटकर हे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
यापूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शाही दसरा महोत्सवास पर्यटन व जिल्हा नियोजन मधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली आहे. याकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मदत केली.
सुनील काटकर यांच्यासोबत काका धुमाळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.