साताऱ्यात आज (बुधवारी) अभिजात मराठी भाषा कथा सौंदर्य कार्यक्रमाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 07 October 2025


सातारा  : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने मसाप, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने साता-यात अभिजात दर्जा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअतंर्गत बुधवार दि. ८ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नुकतेच  यशोदा शिक्षण संस्था येथे मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  झाले. या सप्ताहातील व्दितीय पुष्प श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय सातारा यांच्या सहकार्याने बुधवार दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. ज्येष्ठ कथाकार शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिजात मराठी भाषा कथा सौंदर्य हा कार्यक्रम होणार असून शंकर पाटील, व.बा.बोधे, डॉ.राजेंद्र माने यांच्या कथांचे अभिवाचन वैदेही कुलकर्णी, डॉ. आदिती काळमेख, अजय गिजरे हे करणार आहेत.

या मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताहास मराठी भाषाप्रेमीनी , साहित्य रसिकांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.

  




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तामजाईनगर येथील दुचाकींच्या अपघातातील कोंडवेच्या जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक; प्रारुप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

संबंधित बातम्या