एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 June 2025


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अमित किशोर शिंदे रा. मंगळवार पेठ, सातारा यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून तेथीलच जगन्नाथ आवळे, अमन कांबळे, साहिल कांबळे, विनोद कांबळे यांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदिवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रकला आग लावल्या प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अटकाव प्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या