सातारा : अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली ता.सातारा येथून सुजय बाळकृष्ण साळुंखे (वय 29, रा. कोडोली, सातारा) याच्याकडून अन्न औषध विभागाने छापा टाकून 10 हजार 496 रुपये किंमतीचा पानमसाला व जर्दा जप्त केला. ही कारवाई 18 जुलै रोजी करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.