सातारा : जुन्या वादाच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी जुन्या वादाच्या रागातून राम गोकुळ पवार रा. सदर बाजार, सातारा यांना शनि शंकर पवार रा. सातारा यांनी दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.