छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाने वाचवले लहान बाळाचे प्राण

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व संलग्नित जिल्हा रुग्णालय सातारा येथे अशाच एका बालकावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे सातव्या महिन्यात जन्मलेले आणि १.६ किलो वजन असलेले बाळ श्वसनाचा त्रास व इतर जोखमीसह दि. १० जानेवारी २०२६ रोजी दाखल झाले. सुरुवातीला CPAP वर उपचार करून श्वसन त्रास नियंत्रणात आणण्यात आला. तिसऱ्या दिवशी श्वसन थांबण्याचे काही झटके आल्याने बाळाला व्हेंटिलेशनची गरज भासली. रक्ताभिसरण कमी असल्याने तातडीने सपोर्ट देण्यात आला. पुढे पाचव्या दिवशी अचानक हृदयगती २७०-३०० प्रति मिनिट इतकी वाढली. त्याला supraventicular tachycardia (SVT) हा हृदयाचा गुंतागुंतीचा आजार झाला. हृदयगती इतकी वाढली की, त्यासाठी ताबडतोब इलाज करणे जरुरी होते.

औषधांना प्रतिसाद न दिल्याने आणि परिस्थिती गंभीर होत असल्याने टीमने, एका तासाच्या आत बाळाच्या हृदयाला डिफिब्रिलेटरने शॉक दिला. Synchronized Cardioversion करून हृदयाची गती पूर्ववत केली. वैद्यकीय संशोधनांमध्ये अशा औषध-प्रतिरोधक SVT प्रकरणांचे उल्लेख तुलनेने कमी दिसतात म्हणून हे उपचार "दुर्मिळ पण जीव वाचवणारे" ठरतात. यानंतर बाळाला प्रतिबंधक औषधोपचार देऊन सातव्या दिवशी एक्स्ट्युबेशन करण्यात आले. पुढील उपचारकाल स्थिर राहिला. वजनवाढीवर लक्ष ठेवून ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाळ डिस्चार्ज झाले आहे. दि. १०.०२.२०२६ रोजी बाळ नियमीत लसीकरणासाठी बाहृय रुग्ण विभागामध्ये आले असता सध्या बाळाची वाढ चांगली असून वजन २ किलो झाले असून प्रकृती उत्तम आहे.

हा यशस्वी उपचार छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सदरील उपचारामध्ये बालरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. उदय राजपूत यांनी मुख्य भूमिका पार पाडली तसेच डॉ. उल्का झेंडे यांचा उपचारामध्ये सक्रिय सहभाग होता.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारंडवाडीत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू; घटनेमुळे परिसरात हळहळ
पुढील बातमी
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिन उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या