सातारा : साताऱ्यात कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच झालेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबीरराचा हजारो रुग्णांना लाभ झाला. असंख्य रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
येथील कला, वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान सातारा येथे झालेल्या या शिबिराचे उदघाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात हॉस्पिटलचे सीईओ आणि कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. बसवराज कडलगे, डॉ. राहुल चौगुले, ओंकार कदम, शीतल कात्रे, अनुजा पाटील, मदन गोरे आदी तज्ज्ञांनी रुग्णांची टॅप्सनी केली.
यावेळी हाडाचे फ्रॅक्चर (अपघात मध्ये मोडलेली हाड), अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोथेरपी पोर्ट, डायलिसिस, ए व्ही फिश्चुला (डायलिसिस रुग्णांसाठी), पमकॅथ (डायलिसिस रुग्णांसाठी), दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे ऑपरेशन, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन यांची तपासणी व उपचार करण्यात आले.
तसेच शिबिरात मोफत ई. सी. जी., अँजिओग्राफी, रक्तातील साखर तपासणी, लघवीची धार तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.