विद्यार्थ्यांनी 'अशक्य' या शब्दाचा कडेलोट करावा : खा. उदयनराजे भोसले; मांढरदेव येथे विविध उपक्रम

by Team Satara Today | published on : 05 October 2025


वाई :  सध्याचा काळ हा स्पर्धात्मक आहे. ज्ञानााशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास अंगी बाळगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा वाईट प्रवृत्तींचा कडलोट केला तसा विद्याथ्यार्र्नी अशक्य या शब्दाचा कडलोट करुन जीवनात यश मिळावावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

मांढरदेव, ता. वाई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालभारतीचे प्रथम संचालक स्व. उत्तमराव रघुनाथ सेवलेकर यांचा 53 वा पुण्यतिथी सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनिरुद्ध सेवलेकर, काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मांढरदेव देवस्थानचे विश्वस्त चंद्रकांत मांढरे, जीवन मांढरे, परशुराम मांढरे, बाळासाहेब मांढरे, भाऊसाहेब मांढरे, ज्ञानेश्वर मांढरे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश बोबडे उपस्थित होते.

यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच शाळेत अत्याधुनिक डिजिटल लर्निंग रूमचे उद्घाटन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्पअनिरुद्ध सेवलेकर यांच्यामुळे बळकट झाला. गोल्फ प्रशिक्षणाचा शुभारंभही करण्यात आला.

राजगुरू कोचळे यांनी स्वागत केले.मुख्याध्यापक धोंडीराम वाडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा व कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी, पालक, माजी विद्यार्थी, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनापरवानगी मिरवणूक काढल्याबद्दल कराडामधील दहा मंडळांवर गुन्हे दाखल
पुढील बातमी
प्रेमाचं वय निघून गेलंय... : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंना टोला; ‘मनोमिलना’ची चर्चा सुरू होण्याआधीच फिस्कटल्याची चिन्हे

संबंधित बातम्या