सातारा : सातारा शहर पोलिसांनी शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 27 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील रविवार पेठेत अल्ताफ फिरोज पठाण रा. बुरुड गल्ली, कोरेगाव, जि. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून अठराशे रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, दि. 28 रोजी झाकीर हुसेन साहेबलाल शेख रा. कळकाई गल्ली, कोरेगाव, जि. सातारा हे सातारा शहरातील पंताचा गोट येथे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून पंधराशे पन्नास रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.