सातारा : सोनगाव, ता. सातारा येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोसमोरील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर मारुती कारची (एमएच ४३ एएन ०९५२) दुचाकीस धडक बसली. यात दुचाकीचालक जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला. दि. १६ रोजी ही घटना घडली.
दुचाकीस्वार सयाजी सोपान निकम (वय ४८, रा. व्यंकटपुरा, सातारा, मूळ रा. चिंचणी- डिस्कळ, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली असून, कारचालक विशाल वसंत कुंभार (वय २५, रा. पेरले, ता. कराड) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार वायंदडे तपास करत आहेत.