छत्रपती संभाजीराजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन; बलिदान दिनानिमित्त शहरात मूक पदयात्रा

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त सातारा शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सकाळी छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन आणि सायंकाळी बलिदान दिनानिमित्त गोलबाग राजवाडा ते पोवई नाका अशी मूक पदयात्रा काढण्यात आली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म रक्षक संभाजी म्हणून मोठे योगदान दिले आणि धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. फाल्गुन अमावस्या हा दिवस इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. सातारा शहरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने या दिवसाच्याआधी पंधरा दिवस बलिदान मास पाळला  जातो. प्रतिष्ठानच्यावतीने साताऱ्यात सकाळी नऊ वाजता उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करून अभिवादन करण्यात आले. तसेच श्रीक्षेत्र वढू तुळापूर ता. शिरूर, जि. पुणे येथून आणलेल्या धर्मवीर ज्योतीचे साताऱ्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी या ज्योतीचे पोवई नाकाशिवतीर्थ येथे स्वागत करून या ज्योतीला अभिवादन केले. सातारा पालिकेसमोरील नाना नानी पार्क मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे तैलचित्र उभारण्यात आले आहे. या प्रतिमेला नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर,  नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेविका हेमलता येवले, नगरसेविका अनिता फरांदे, नगरसेवक सुशांत महाजन यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सायंकाळी राजवाडा गोलबाग ते पवई नाका छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रायगडावर बुधवारी ‘ऐतिहासिक शौर्य दिन’ सोहळा; छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी खंडेराव बर्गे यांना कोरेगावकर नागरिक करणार अभिवादन
पुढील बातमी
झेडपीच्या ४५ कोटी ४० लाखांच्या अर्थसंकल्पास प्रशासकीय मान्यता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर अर्थसंकल्पाला मिळणार अंतिम मंजुरी

संबंधित बातम्या