सातारा : सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 डीएस 6393 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 13 मे रोजी घडली असून याप्रकरणी अनिकेत नंदकुमार काळे (वय 30, रा. पाटखळ ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.