सातारा तालुक्यातील साबळेवाडी फाट्यावर कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा : जनावरांची वाहतूक करण्यासाठी परवान्यापेक्षा जास्त जनावर घेऊन जात असल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी जगन्नाथ परशुराम बडदरे (वय ४९,रा. सारखळ) निलेश बाबर (रा. कामथी,ता. सातारा) अझर उर्फ अझरुद्दीन कुरेशी (रा. सदर बाजार) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा तालुक्यातील साबळेवाडी फाट्यावर दि २० रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास बोलेरो पिकअप क्रमांक(एम. एच. १२ एफ.डी ५३३) मध्ये दोन बैले दाटीवाटीने भरून त्यांची वाहतूक करत असल्याची बजरंग दल आणि गोरक्षकांना माहिती मिळाली,गोरक्षकांनी याची कल्पना तालुका पोलिसांना दिली,यावेळी पोलिसांना पिकअप गाडीमध्ये २ बैल आढळून आले, त्यांना हालचाल करता येणार नाही. त्यांना वेदना, यातना होतील अश्या रीतीने दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. 

जनावरांची वाहतूक करण्यासाठी परवान्यापेक्षा जास्त जनावर घेऊन जात असल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी जगन्नाथ परशुराम बडदरे (वय ४९,रा. सारखळ) निलेश बाबर (रा. कामथी,ता.जि. सातारा) अझर उर्फ अझरुद्दीन कुरेशी (रा. सदर बाजार) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात गॅलेक्सी समूहचा एक महत्त्वाचा टप्पा; गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पजच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन
पुढील बातमी
क्षेत्रमाहुली येथे चारचाकीची दुचाकीला धडक; एक जण जखमी, चारचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या