नवी कोरी थार आणि वेदांतसाठी उदयनराजे यांचे लॉट्स ऑफ लव्ह

जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी भरवला पेढा

by Team Satara Today | published on : 22 June 2025


सातारा : रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांचे चिरंजीव वेदांत मोझर यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेदांतला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. खूप प्रगती कर आणि वेदांतसाठी खूप सारे प्रेम, अशा हटके शुभेच्छा उदयनराजे यांनी वेदांत मोझर यांना दिल्या.

जलमंदिर येथे वेदांत मोझर यांचा वाढदिवस साजरा करताना रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदादा मोझर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण व सातारा विकास आघाडी तसेच उदयनराजे यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. रक्षक प्रतिष्ठानच्यावतीने वेदांत मोझर यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुशीलदादा यांनी आपले चिरंजीव वेदांत मोझर यांना नवी कोरी थार गाडी गिफ्ट केली. त्या गाडीसह दोघे बाप-लेक जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. या दोघांना पाहून उदयनराजे भावूक झाले. उदयनराजे यांनी वेदांतसाठी भरभरून शुभेच्छा देत आयुष्यात खूप प्रगती कर, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच त्यालाआलिंगन देऊन त्याला पेढा भरवला. यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. नव्या कोऱ्या थार गाडीची उदयनराजे यांनी पाहणी करून त्या गाडीचे कौतुक केले. ज्या कार्यकर्त्यांनी मला माझ्या 34 वर्षाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस साथ दिली, त्यांच्यामुळेच मी आज आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी मी कायम मदतीसाठी तयार आहे, असे भावनिक आश्वासन उदयनराजे यांनी दिले. मुलांनी खूप शिकावे प्रगती करावी. अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गाडीमध्ये ठेवलेल्या सॅकसह रोख रकमेची चोरी
पुढील बातमी
सज्जनगड नजिक कोसळली दरड

संबंधित बातम्या