बंगळुरु : बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे आजारही वाढले आहे. कधीकाळी 50 नंतर येणारे आजार आता 20 मधील युवकाला येत आहे. ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. कर्नाटकातील बंगळूरुमध्ये ह्रदयविकारचा धक्कादायक प्रकार समोर आला. काँग्रेस नेता पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. क्षणात त्यांना मृत्यूने गाळले. हा व्हिडिओ अंगावर शहारे निर्माण करणारा आहे. बंगळुरुमधील कुरुबा संघाचे अध्यक्ष सीके रविचंद्रन यांचा या घटनेत मृत्यू झाला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या विरोधातील खटल्यास राज्यपालांनी परवानगी दिली. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात पत्रकार परिषदेचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस नेते रविचंद्रन बोलत होते. बोलता बोलता अचानक ते खुर्चीवरुन खाली पडले. त्यांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.