सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. सात रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास मोळाचा ओढा ते रामनगर रस्त्यावर ओंकार संदीप काळे (रा. आंधळी, ता. माण) या पादचाऱ्याला पाठीमागून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी पिकअप (क्र. एमएच ११ सी एच ४५०३) वरील चालक सुनील उर्फ प्रवीण राजेंद्र सुतार (रा. संगम माहुली, ता. सातारा) याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साठे करीत आहेत.