सातारा नगरपालिकेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

by Team Satara Today | published on : 31 May 2025


सातारा : सातारा पालिकेत कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या नगर प्रशासन संचालनालयाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यातील चार अधिकाऱ्यांची सातारा जिल्ह्यात, तर एका अधिकाऱ्याची पुणे येथे बदली झाली आहे.

आस्थापना विभागप्रमुख हिमाली कुलकर्णी यांची मेढा नगरपंचायतीत बदली झाली, तर सभा अधीक्षक आणि सहाय्यक भांडार पर्यवेक्षक अतुल दिसले यांची सासवड (जि. पुणे) येथे बदली झाली आहे. आरोग्य विभागातील तीन कर्मचाऱ्यांची एकाचवेळी जिल्हांतर्गत बदली करण्यात आली. सध्या आरोग्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रकाश राठोड यांची रहिमतपूर, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांची पाचगणी, तर प्रशांत गंजीवाले यांची वाई पालिकेत बदली झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना दि. ३० मे रोजी कार्यमुक्त करण्यात आले असून, नवीन ठिकाणी सोमवारी (दि. २ जून) हजर राहण्याचे आदेश नगर प्रशासन संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.प्रमिला शिंदे
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या