सातारा : सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाराष्ट्रात दुही व अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीकडून काल महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाचा प्रयत्न झाला. परंतु, राज्यातील जनताच आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांना उत्तर देणार आहे. मालवणची घटना दुर्दैवी आहेच. या घटनेचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, त्यावरुन ‘मविआ’तील तिन्ही पक्षांकडून सुरू असलेले राजकारणही गलिच्छ आणि संतापजनक आहे. काही दिवसांपासूनचे विरोधकांचे वर्तन महाराष्ट्रात दुही व असंतोषाचे वातावरण निर्माण करणारे आहे. शांत व समृद्ध महाराष्ट्र विस्कटावा, अशा प्रकारची त्यांची विधाने आहेत.
छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचा चुकीचा इतिहास शिकवला गेला, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचे समर्थन करताना उपाध्ये म्हणाले की, फडणवीस यांचे विधान बरोबर आहे. कारण, आमच्या दृष्टीने शिवरायांची सुरतेवरील स्वारी ही लूट नव्हती, तर ती स्वराज्य विजयाची मोहीम होती. ज्याप्रमाणे 1857चे स्वातंत्र्यसमर हे बंड नसून स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते, त्याचप्रमाणे शिवरायांची सुरतेवरील स्वारीही लुटीसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी होती. कारण, लुटीच्या वेळी सरसकट सगळे लुटले जाते. पण, महाराजांनी त्यावेळी अनेकांना उदारपणे अभय दिले होते आणि त्यांचे संरक्षण केले होते. 1857च्या स्वातंत्र्यलढ्याला स्वातंत्र्यसमर न मानता बंड समजणे, हा इंग्रजांचा वसाहतवादी दृष्टिकोन होता. इंग्रजांचाच कित्ता गिरवत कॉंग्रेसने स्वातंत्र्यसमराची संभावना बंड अशी केली.
मालवण येथील शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी पुरेशी नाही, या विरोधकांच्या आक्षेपाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. उपाध्ये म्हणाले की, जर माफी पुरेशी नसेल तर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी शिवरायांविषयी अनुद्गार काढून माफी मागितली होती. मग ‘मविआ’ कुठले जोडे मारो आंदोलन करणार? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांची सार्वत्रिक कत्तल झाल्याप्रकरणी सोनिया गांधींनी शीख समुदायाची माफी मागितली होती. जर ही माफी पुरेशी नसेल तर त्यांच्याविरोधात कोणते आंदोलन करणार? प्रत्यक्षात या आघाडीतील तिन्ही पक्षांचे शिवप्रेम बेगडी आहे. कारण, ते असते तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर वर्षानुवर्षे झालेल्या अतिक्रमणांकडे त्यांनी दुर्लक्ष केले नसते.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |