सातारा : समर्थ मंदिर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास सुरज बाळू जाधव रा. बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर, सातारा यांची पंधरा हजार रुपये किंमतीची दुचाकी क्र. एमएच 11 सीवाय 5661 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.