सातारा : राज्यशासनाने दोन सप्टेंबर 2025 रोजी कुणबी मराठा या नोंदी मान्य करणारा जीआर काढला होता तो जीआर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आणणार आहे ते जीआर तात्काळ रद्द करावेत यासाठी सातारा जिल्हा ओबीसी महासंघाने साताऱ्यात मोर्चा काढला हा मोर्चा पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरम्यान काढण्यात आला होता.
सातारा जिल्हा ओबीसी महासंघाचे संघटक सातारा जिल्हा ओबीसी महासंघाचे संघटक पोपटराव गवळी व सातारा जिल्हा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भरत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनेक महासंघाचे सदस्य सहभागी झाले होते .शासनाने ओबीसी समाजाला आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले आहेत त्या महामंडळांना 500 कोटी भाग भांडवल द्यावे मराठा कुणबी नोंदी मान्य करणारे शासनाने जीआर रद्द करावे समस्त ओबीसी समाजाचे 19 टक्के आरक्षण 2 सप्टेंबर च्या जीआर ने काढून घेण्यात आले आहे.
त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत करावी मराठा समाजातील गोरगरीब हे आमचे बांधव आहेत रोज त्यांच्यावर आम्हाला बसावे उठावे लागते त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे मात्र त्यांना 19 टक्के एवढे स्वतंत्र आरक्षण द्यावे एसीबीसी या अंतर्गत असणारे दहा टक्के आरक्षण 19 कॅन पर्यंत वाढवावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.