सातारा : सातारच्या जुनी एमआयडीसी परिसरात चक्कर येऊन बेशुध्द पडलेल्या एकाला रुग्णवाहिकेतून सातारा सिव्हील हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
महादेव किरराप्पा घोडके (वय-५७, रा. किवळे, ता. जि. पूणे) असे यातील मयताचे नाव आहे. सोमवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार घडला असून डॉ. प्रणाली भोसले यांनी याबबातची खबर सातारा शहर पोलिसांत दिली आहे.