आ. डी. बी. कदम प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करणार; खासदार नितीन पाटील; ४० वा स्मतिदिनानिमित्त अभिवादन

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा :   कै. आ. डी. बी. कदम यांनी भुविकास बँकेच्या व किसन वीर कारखान्याच्या माध्यमातन गोरगरिब जनतेच्या अडी -अडचणी सोडविण्याचे काम केल्याने त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. कै. आ. डी. बी. कदम यांच्या नावाने सरू असलेले प्रतिष्ठान सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काम अविरतपणे सुरू रहावे, यासाठी येणाऱ्या अडचणींचे निवारण करणार असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन ना. मकरंद पाटील व खासदार निधीतून प्रतिष्ठानला सहकार्य करणार असल्याची हमी, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन व खासदार नितीन पाटील यांनी दिली.

कै. आ. डी. बी. कदम यांच्या ४० वा स्मृतिदिन आरळे येथील कै. आ. डी. बी. कदम सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळ ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडीक, श्रीमती शशिकला धोंडीराम कदम यांची प्रमख उपस्थिती होती.

खासदार पाटील पुढे म्हणाले की, कै. आ. डी. बी. कदम यांच्या विचारांचा वारसा व आदर्श पुढे चालविण्यासाठी हे सभागृह सर्वसामान्य जनतेसाठी कमीत कमी मोबदला घेऊन त्याचा वापर करण्यात यावा. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण यांनी कै. आ. डी. बी कदम यांच्या कार्याची  माहिती दिली. अरविंद कदम, उमेश साबळेसर , काका पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

विकास कदम यांनी सूत्रसंचालन केले.  किसन वीर कारखान्याचे संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले.

कै. आ. डी.बी कदम यांच्या पुर्णाकृती पृतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास किसन वीरचे संचालक सचिन साळुखे, संजय फाळके, हणमंतराव चवरे, राहुल शिंदे, मनोज देशमख, बबनराव साबळे, संपतराव शिदे. मानसिंगराव साबळे, अशाोक फाळके, विलास कदम, महादेव कदम, अविनाश कदम, कुशालराव कदम, बाळासाहेब बर्गे, विठ्ठलराव कदम, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, आरळे ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुरोगामी महिलांच्या साहित्यावर व्याख्यानमाला; साताऱ्यातील पाठक सभागृहात शुक्रवारी होणार प्रारंभ
पुढील बातमी
विभागीय क्रीडा स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील प्रतीक जाधवचे सुयश

संबंधित बातम्या