सातारा, दि. १३ : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांच्यातर्फे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम सपनोंका सौदागर या संकल्पनेअंतर्गत सादर केला जाणार आहे.
सोमवार, दि. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे .यावेळी गायक कलाकार डॉक्टर लियाकत शेख, अल्ताफ मुल्ला, डॉक्टर वाय पी चव्हाण, जलील शेख, गणेश शिंदे, वनिता कुंभार मंजिरी दीक्षित, सीमा राजपूत, चित्रा भिसे विविध गाणी सादर करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद पांडे, विजय जंगम, विश्वास पवार, मकरंद भेडसगावकर, मुकुंद फडके, सुनील साबळे, शिरीष चिटणीस व डॉ. लियाकत शेख उपस्थित राहणार आहेत. यावेळी सातारची शिखर कन्या धैर्या विनोद कुलकर्णी हिचा माय बिट्स स्टुडिओ तर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन व संकल्पना डॉ. लियाकत शेख यांची असून ध्वनी व्यवस्था अक्षता व सचिन शेवडे पाहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन चित्रा भिसे करणार आहेत .सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरीष चिटणीस व डॉक्टर लियाकत शेख यांनी केले आहे.