सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून 3 गुन्हे दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चक्री जुगार अड्ड्यांचाही समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे नाका येथे शेखर राजाराम परदेशी (वय 56, रा.करंजे) याच्यावर कारवाई करुन 1880 रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले.
दुसरी कारवाई करंजे परिसरातच परशुराम उत्तम जाधव (वय 42, रा.रविवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून 10500 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. हे दोन्ही गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे.
तिसरी कारवाई शेंद्रे ता.सातारा येथे उमेश लक्ष्मण जाधव (वय 30, रा. सोनगाव ता.सातारा) याच्यावर करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून 10250 रुपये किंमतची जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.