सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय युवती राहत्या घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, सातारा शहर परिसरात राहणारी १९ वर्षीय युवती सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून क्लासला जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय युवती राहत्या घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रहिमतपूरमध्ये बाळासाहेब पाटील गटाला खिंडार; अनेकांचे आ. मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश
पुढील बातमी
महिलेसह तिच्या भावाला मारहाणप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या