सातारा शहराच्या चौफेर विकासासाठी 'कमळ' हाच पर्याय ; ना. शिवेंद्रसिंहराजे; भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 27 November 2025


सातारा :  सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहरात पदयात्रांचा धडाका सुरु ठेवला आहे. यामुळे वातावरण ढवळून निघाले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार सातारकरांनी केला आहे. दरम्यान, सातारा शहराच्या चौफेर विकासासाठी 'कमळ' हाच पर्याय असून सातारकरांनी भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतदान करावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. 

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे उमेदवार अशोक मोने, सुजाता राजेमहाडिक, धनंजय जांभळे, प्राची शहाणे, राजू गोरे, सिद्धी पवार, मोनिका घोरपडे आदी उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

त्यांचे कारनामे सातारकरांना चांगलेच माहिती

केवळ निवडणूक आली की विरोधक आपल्याला दिसू लागतात. पाच वर्ष हे कुठे असतात? याचा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. पैशासाठी ठेकेदाराकडून मार खाणारे साळसूद असल्याचा आव आणून फुकाच्या गप्पा मारत आहेत. त्यांचे कारनामे सातारकरांना चांगलेच माहिती आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी, नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते आणि भाजपचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होणार आहेत. सातारकरांनी फक्त भरभरून मतदान करावे आणि एक विक्रम करून दाखवावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नंदना माने यांच्या पाठीशी नागरिकांनी उभे रहावे - अजितदादा पवार; रहिमतपूरच्या विकासात कमी पडणार नाही
पुढील बातमी
वाई नगरपालिकेतील दहशतवाद मोडून काढणार- ना. जयकुमार गोरे; भाजपच्या संपर्क दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या