04:32pm | Sep 19, 2024 |
पुणे : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या दोन तरुणांचा (वय 27 आणि 35) मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा डीजे च्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची दाट शक्यता असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून ला करण्यात आले आहे आणि त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
नयन रवींद्र ढोके (वय 27, रा. औंध) आणि विशाल बल्लाळ (वय 35, रा. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. नयन हा मंगळवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास विजय टॉकी जवळ निपचित पडलेला दिसला. त्याबाबत पोलिसांनी स्पीकर वरून घोषणा केली असता जवळच विजय टॉकी येथे असलेल्या डायल 108 च्या आंबूलन्स वरील डॉक्टर सौरभ बारकुले आणि आणि चालक महेश राठोड तिथे पोचले. त्यांनी नयन ला तपासले असता त्याचा श्वास बंद पडलेला होता. पोलिसांच्या मदतीने तातडीने जवळील कार्डियाक आंबूलन्स मध्ये घेऊन गेले. तेथे त्याला डॉ. बारकुले, हेल्थ कॅम्प मधील फिजिशियन डॉ. तुषार जगताप व डॉ. संदीप बुटाला यांनी सीपीआर दिला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान त्याला डायल 108 आंबूलन्स मधून ससूनला घेऊन जात असताना डॉ. बारकुले आणि डॉ. जगताप यांनी डिफ्रिबिलेटर (हृदय सुरू करण्यासाठी शॉक देणे) पण त्याचे हृदयाचे कामकाज सुरू झाले नाही, डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या हवाली करण्यात आला अशी माहिती डायल 108 चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियंक जावळे यांनी दिली.
दरम्यान दुसरा पेशंट विशाल याला विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता ससूनला आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु हा पेशंट नेमका कोठे होता, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दोन्ही तरुणांचे मृत्यू ससूनला आणण्याआधीच झाले होते. त्यांचे शवविच्छेदन केले असून नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत निश्चित निदान करण्यासाठी त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळा तपासणी करण्यासाठी राखून ठेवला आहे. - डॉ. येल्लापा जाधव, वैदयकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |