सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती साजरी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची पूर्व तयारी आढावा बैठक झाली. यावेळी अधिकाऱ्यांना नियोजनाची जबाबदारी देण्यात आली. तसेच यावेळी नूतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अधिकाऱ्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
नायगाव, ता. खंडाळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रज्ञा माने, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा समाजल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथिमक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदींसह नायगावचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नायगावमधील कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांवर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली. यादरम्यान ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच अधिकाऱ्यांनी स्वागत केले.