सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीपी 0151 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी रोहित शंकर रेवाळे (वय 31, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 डिसेंबर रोजी घडली आहे.