साताऱ्यात उद्या भाजप नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा ; मुख्यमंत्री फडणवीस, ना. शिवेंद्रसिंहराजे, ना. गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 01 January 2026


सातारा  : सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ७ नगराध्यक्ष निवडून आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले असून शुक्रवार, दि. २ रोजी दुपारी १२.३० वाजता भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणार आहे. 

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे होणाऱ्या या सोहळ्याला खा.  उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तरी, या सत्कार समारंभास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान - डॉ. तारा भवाळकर ; साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा
पुढील बातमी
वृंदावन पोलीस टाऊनशिपच्या सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण

संबंधित बातम्या