सातारा : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पूरग्रस्तांसाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणुन आज सातारा तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने सुरूची पॅलेस येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी " चिफमिनिस्टर रिलीफ फंड " साठी आर्थिक मदत म्हणुन रु. 25000/00 चा धनादेश देण्यात आला. त्यांचे सूचनेनुसारहा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वैशाली राजमाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शेटे, तालुका अध्यक्ष संजय रजपूत, कार्याध्यक्ष बबनराव देवरे, जेष्ठ मार्गदर्शक गोविंद गंधाले, उपाध्यक्ष सागर साळुंखे, जयंत गुजर, खजिनदार संदीप भणगे, सचिव प्रमोद तपासे, संचालक सौ. उषा होलमुखे, मारुती किर्दत, धनंजय शिंदे, प्रदीप पवार, जितेंद्र मोहिते, बाळू शेंडगे, सुरेश सावंत, हेमंत त्रिगुणे, विलास जाधव, किरण गायकवाड, मोहम्मद बागवान, रामराव निकम, युवराज राजे, अमर मोरे, दिलीप भंडारी, विकास वांगडे, ईत्यादी दुकानदार बंधू- भगिनी उपस्थित होते.