हिमाचलमध्ये ५ ठिकाणी ढगफुटी

व्यास नदीने धारण केले रौद्ररूप

by Team Satara Today | published on : 01 July 2025


हिमाचल : गेले काही दिवसांपासून देशाच्या विविध राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरु आहे. मंडी जिल्ह्यात तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्यांची रौद्रस्वरूप धारण केले आहे. मागील १५ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे. शाळा, कॉलेजला देखील सुट्टी देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ७ जण बेपत्ता असल्याचे समजते आहे. सिमलामध्ये ५ मजल्यांची इमारत कोसळली आहे. मात्र धोका ओळखून प्रशासनाने आधीच इमारत मोकळी केलीहोती. तेथील रहिवाशाना दुसरीकडे स्थलांतरित केले होते.

ढगफुटी झाल्याने मंडी जिल्ह्यातील अनेक शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मंडी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पंडोह धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज देखील मंडी जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

हिमाचल प्रदेश जोरदार पाऊस सुरु असून व्यास नदी दुथडी भरून वाहत आहे. पंडोह धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने व्यास नदीने रौद्रस्वरूप धारण केल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. तर नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पाऊस सलग सुरू असल्याने चिंता वाढली आहे. काही ठिकाणी ढगफुटी देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्य आपत्तीव्यवस्थापन केंद्राच्या रिपोर्टनुसार, भुस्खलन होण्याची 22 ठिकाणे घोषित करण्यात आली आहेत. तर त्यातील 18 ठिकाणे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.सरकारच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 82 नागरिक जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आता पर्यन्त 75 कोटींचे नुकसान झाले आहे. 22 ठिकाणी सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर जावे असे आवाहन सरकारने केले आहे. अति धोकादायक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे परीतनवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सेज घाट परिसरात ढगफुटी झाली आहे. यानंतर तेथील एका नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेथील पार्वती नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याचे समजते आहे.

कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीचे भयानक स्वरूप यामध्ये दिसून येत आहे. हवामान विभगाने पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी
पुढील बातमी
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी संपत जाधव

संबंधित बातम्या