पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 33,912 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनीत्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. सध्या कोयना धरणात एकूण 59.91 टीएमसी उपलब्ध तर 54.91 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
बुधवार संध्याकाळी पाच ते गुरुवारी संध्याकाळी पाच या चोवीस तासातील पाऊस मि.मी.मध्ये पुढील प्रमाणे - कोयनानगर 84,नवजा 86,महाबळेश्वर 109.धरणातील पाणीउंचीत 3.4 फुटांनी तर पाणीसाठ्यात 2.93 टीएमसीने वाढ झाली आहे.