सातारा : सातारा बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बसस्थानकात अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरले. हा प्रकार दि. 2 रोजी घडला. रुपाली चंद्रकांत भिसे (वय 35, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोहिते तपास करत आहेत.
सातारा बसस्थानकातून मंगळसूत्राची चोरी
by Team Satara Today | published on : 08 February 2025