सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टीव्हीचा आवाज कमी करा, असे म्हटल्याच्या कारणावरून तक्रारदार महिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी योगेश बबन गायकवाड आणि त्यांची पत्नी रा. रामाचा गोट, सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.