कोरेगाव तालुका तलाठी संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी के. टी. तथा किरण पवार यांची एकमताने निवड

by Team Satara Today | published on : 11 December 2025


कोरेगाव : तालुका तलाठी संघाची सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवड प्रक्रिया कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडली. संघटनेच्या घटनेनुसार पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली. नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आले असून अध्यक्षपदी के. टी. तथा किरण पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

निवड प्रक्रियेचे मार्गदर्शन तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल शिंदे, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे निमंत्रित सदस्य श्रीरंग मदने, तसेच पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या या निवडणुकीत पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

नूतन कार्यकारिणीमध्ये के. टी. तथा किरण पवार  अध्यक्ष, श्रीमती वैशाली गवळी  उपाध्यक्ष, शैलेश पोळ कार्याध्यक्ष, सागर लावंड सरचिटणीस, श्रीमती राऊ मुगळे  सहसरचिटणीस, चंद्रकांत गायकवाड  खजिनदार, सुभाष संकपाळ हिशोब तपासनीस, ओंकार बारटक्के व प्रकाश क्षीरसागर संघटक, हिम्मत बाबर सल्लागार, के. टी. तथा किशोर धुमाळ मंडलाधिकारी प्रतिनिधी, श्रीमती शुक्रांती खांडेकर व श्रीमती शमशाद शेख – महिला प्रतिनिधी, तर सदस्य म्हणून राहूल नाळे, शशिकांत घोरपडे, विशाल शिंदे, स्वप्नील दडस, देविदास जाधव, गणेश माने, श्रीमती सोनाली वाघ, निवृत्ती हुडे, संकेत भोसले आणि अनिल दिंडे यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शकांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचना यामुळे निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. या बद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे मच्छिंद्र शिंदे यांनी आभार मानले. नवीन कार्यकारिणीला पुढील कार्यकाळात संघटनेची भक्कम वाढ घडवून आणण्यासाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सखी वन स्टॉप सेंटर व महिला सक्षमीकरण केंद्राचा गरजू महिलांनी लाभ घेण्याचे सातारा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडूनआवाहन
पुढील बातमी
ट्रॅक्टर -ट्रॉलीचे चाक डोक्यावरून जाऊन महिलेचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या