सातारा : महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरा नजीकच्या एका उपनगरात राहणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी निहाल पापाभाई सय्यद रा. करंजे, सातारा. मूळ रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.