सातारा : फलटण तालुक्यातील पवारवाडी गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना घडली असून सुमारे ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळूराम मारुती शेंडगे (वय - २३, व्यवसाय - सोलार टेक्निशियन, रा. पवारवाडी ता. फलटण जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवारवाडी गावच्या हद्दीत एमएसईबी कार्यालयासमोर त्यांनी त्यांची सिल्व्हर रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एम एच-५-०४९१) उभी केली होती. शुक्रवारी (दि. ६) दुपारी सुमारे १.३० ते २ या वेळेत अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरुन नेऊन पोबारा केला आहे. या मोटारसायकलीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.