सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्नेहल संतोष कल्याणकर राहणार मल्हार पेठ सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी प्रेमचंद देविदास तपासे, सविता प्रेमचंद तपासे, विजया पोळ, सिद्धार्थ प्रेमचंद तपासे सर्व रा. मल्हार पेठ, सातारा आणि पद्मा सर्जेराव सोनावणे रा. कोल्हापूर यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.