सातारा : जिल्ह्यामध्ये फलटण व महाबळेश्वर वगळता झालेल्या इतर आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सरासरी 66.59 टक्के मतदान झाले .सातारा पालिकेत सर्वाधिक कमी 58.54 तर मेढा नगरपंचायतीत सर्वाधिक 84.23% मतदान झाले आहे .जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्री उशिरा याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सातारा जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती .महायुती मध्ये असणाऱ्या घटक पक्षांमध्येच विशेषता भारतीय जनता पार्टी व शिंदे गट शिवसेना यांच्यामध्ये जोरदार रस्सी खेच पाहायला मिळाली .महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सुद्धा साताऱ्यात लढत देण्याचा जोरदार प्रयत्न झाला .सातारा पालिकेमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आला एक लाख 48 हजार मतदारांपैकी केवळ 86 हजार 812 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये 44 हजार 742 पुरुष तर 42 हजार 56 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला .मेडा नगरपंचायतीमध्ये एकूण 400026 मतदारांपैकी 3391 लोकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे 84.23% मतदान झाले आहे.मलकापूर नगरपंचायतीमध्ये 15770 तदारांपैकी 12806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे 81.20% मतदान झालेत्यानंतर पाचगणी नगरपालिकेमध्ये 77.33% मतदान झाले आहे .एकूण तीन लाख 24835 मतदारांपैकी जिल्ह्यात दोन लाख 18 हजार 699 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .सातारा जिल्ह्यामध्ये सरासरी 66.59% मतदान झाल्याने राजकीय उत्सुकता काही ठिकाणी जाणवली तर काही ठिकाणी प्रचंड निरुत्साह जाणवला आहे .
निकाल लांबणीवर पडल्याने धाकधूक वाढली
सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली होती. शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे गटाने सुद्धा साताऱ्यात 17 उमेदवार देऊन आणि जिल्हा 127 उमेदवारांच्या माध्यमातून कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. महायुतीमध्ये विशेषता मतदानाच्या दिवशी साताऱ्यात शिंदे गटविरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये विशेषता सातारा शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवारांची धाकधूक प्रचंड वाढली आहे. नाराजांची रसद अपक्षांना तसेच कमळ चिन्हावर असणाऱ्या उमेदवारांना मतदारांच्या नाराजीचा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे .अर्थात या चर्चांचा खरा अंदाज निकालाच्या दिवशीच येणार आहे .मात्र खुल्या जागांवर इतर प्रवर्गाची झालेली अतिक्रमण दुखावलेला ओबीसी वर्ग तसेच भारतीय जनता पार्टीची अग्रेसर रणनीती यामुळे संधी न मिळालेल्या नाराजांची रसद अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्याची चर्चा आहे .
राष्ट्रवादीची साताऱ्यात तातडीची बैठक
नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये एकूण नऊ उमेदवार होते यामध्ये खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील व महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यात खरी लढत होणार आहे .साताऱ्यामध्ये तुतारी की कमळ या चर्चेमध्ये साताऱ्यात नाराजांनी तुतारी वाजवल्याची चर्चा असल्याने आश्वासता निर्माण झाली आहे .एकूणच या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आणि एकूणचझालेले मतदान शिवाय कोपरा सभांना मिळालेला प्रतिसाद याबाबत राजकीय गणिते मांडली जात आहेत .शशिकांत शिंदे यांनी सर्व उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली तसेच सुवर्णाताई पाटील यांच्याशी चर्चा केली साताऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये चांगल्या पद्धतीने तुतारी वाजेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे .त्या दृष्टीने साताऱ्यात कमळ फुलणार की नाही या निमित्ताने भारतीय जनता पार्टी विशेषता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
झालेले मतदान
पाचगणी 77.45%, सातारा 58.54%
मलकापूर 68.5%, म्हसवड 79.85%
वाई ७२.९८%, कराड 69.91%
रहिमतपूर 81.20%, मेढा ८४.२३%