सरकारने जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेतला

एडवोकेट असीम सरोदे यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 30 August 2025


सातारा : केंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहे आणि जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत असल्याचा थेट आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे विधिज्ञ एडवोकेट असीम सरोदे यांनी सातारा येथे बोलताना केला.‌

सातारा विधानसभा मतदारसंघाचे 1952 ते 1962 या कालावधीत आमदार असलेले व कामगार कष्टकरी चळवळीचे नेतृत्व करणारे कॉम्रेड व्ही एन पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कॉम्रेड व्ही. एन पाटील स्मारक समिती सातारच्या वतीने सातारा येथील दैवज्ञ सांस्कृतिक भवन मध्ये हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड व्ही एन पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे होते. न्यायिकता व लोक सुरक्षा या महत्वपूर्ण विषयावर ऍडव्होकेट असीम सरोदे बोलत होते. 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे देशाला लागलेले ग्रहण आहे तर दुसरीकडे जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी लोकशाहीचा गळा दाबत आहेत या कायद्यांचा वापर गैरवापरासाठी करत आहेत सध्याच्या न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास जर डळमळीत झाला तर लोकशाहीचा कडेलोट होईल असे स्पष्ट प्रतिपादन एडवोकेट असीम सरोदे यांनी केले. 

राष्ट्रीय काँग्रेस म्हणत आहे की आम्हाला जन सुरक्षा कायदा मान्य नाही परंतु त्याला त्यांनी विरोधी सभागृहात केला नाही आता जनसुरक्षा कायदा पुढे करून असंघटितांच्या चळवळी कामगारांच्या चळवळी दलितांच्या चळवळी दाबल्या जात आहेत असे सांगून एडवोकेट असीम सरोदे म्हणाले की न्यायव्यवस्था टिकून द्यायची नाही असे केंद्र व राज्य सरकारने ठरवलेले आहे. त्यामुळेच अनेक घडले प्रलंबित आहेत व सत्ताधाऱ्यांना वाटतंय त्या पद्धतीने ते न्यायालयांमध्ये सर्वोच्च स्थानी त्यांना हवे अशांना स्थान देत असल्याचेही सरोदे यांनी म्हटले आहे. 

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीवर बसून कायद्याची पायमल्ली केली आहे ही सरंजामशाही नाही ही लोकशाही आहे असे शंभूराज देसाई यांना आता जनतेने विचारले पाहिजे असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.‌

भाजपचे नेते निलेश राणे यांनी माकडासारख्या उड्या मारण्याऐवजी बंदराचे कामकाज नीट करणे अपेक्षित आहे त्यांना राज्यात सर्वत्र हिंदू- मुस्लिमांमध्ये , हिंदू - ख्रिश्चनांमध्ये भांडणे लावण्यासाठीच पाठवले जात आहे की काय असा सवाल एडवोकेट सरोदे यांनी उपस्थित केला.‌ 

अध्यक्षस्थानावरून बोलताना कॉ अतुल दिघे यांनी कॉ व्ही एन पाटील यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीत च्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करून सध्याच्या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. 

प्रारंभी कॉ व्ही एन पाटील यांच्या प्रतिभेला प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कॉ विजय निकम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी व्ही. एन पाटील यांचे एक वयोवृद्ध असे चळवळीतील सहकारी कॉ त्र्यंबक ननावरे यांचा असीम सरोदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

आभार कॉ प्रमोद परामणे यांनी मानले.‌  व्याख्यानास कार्यकर्ते,  विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी , युवक - युवती बहुसंख्येने उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘जलसमाधी’ला महू धरणग्रस्तांचा विरोध
पुढील बातमी
वेण्णा लेकनजीक आढळले अजगर

संबंधित बातम्या