ईएसआयसी हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे

खासदार उदयनराजे भोसले; केंद्रीय क्रीडामंत्र्यांची घेतली भेट

by Team Satara Today | published on : 25 March 2025


सातारा : मंजुर असलेल्या ईएसआय हॉस्पिटल ची उभारणी साताराच्या एमआयडीसी मधील जागेत तातडीने सुरु करावी. छत्रपती शाहु स्टेडियम येथे ॲथलेटीक पटुंसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि बास्केटबॉल पटुंसाठी इंन्डोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे, आणि सातारा मध्ये आर्चरी खेळासाठी ग्राऊंडसह अन्य सुविधा निर्माण कराव्यात इ. मागण्या आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारताचे क्रीडा, कामगार आणि रोजगार मंत्री ना. मनसुख मां‍डविया यांचेकडे केल्या. 

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, आमच्या पाठपुराव्यामुळे  सन २०२४ मध्ये साताऱ्यासाठी स्वतंत्र ईएसआय हॉस्पिटल मंजुर करण्यात आले आहे, आणि एमआयडीसी मधील शासकीय दुध योजनेची जागा ईएसआय हॉस्पिटल करीता १ रुपये प्रति स्केअर फुट प्रमाणे प्रदान करण्याचा निर्णय झालेला आहे. आता आधिक वेळ न गमवता हॉस्पिटल उभारणीची कार्यवाही करण्यासाठी डीपीआर तयार करणे, आवश्यक ते व्यवस्थापन नियुक्त करणे आणि ईएसआय हॉस्पिटलसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे या बाबी प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तसेच सातारा येथे ३२०० आस्थापना आहेत. या आस्थापनामधील हजारो कर्मचारी ईएसआय योजनेचे सदस्य आहेत. ईएसआय योजनेशी संबंधीत कारणांसाठी या कर्मचाऱ्यांना कोल्हापूर येथे ईपीफ ऑफिसमध्ये जावे लाागते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळेचा आणि खर्चाचा अपव्यय होतो हे टाळण्यासाठी ईएसआय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातारा येथे ईपीएफचे ऑफिस / सब ऑफिस स्थापन करणे आवश्यक आहे.

सातारा येथील छत्रपती शाहु स्टेडियम येथे ॲथलेटीक पटुंसाठी ट्रॅक आहे तथापी सिंथेटिक ट्रॅक नाही. त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिडा पटु निर्माण होण्याला मर्यादा पडत आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रतिनिधीत्व केलेली ललीता बाबर आणि अन्य मान्यवर, ॲथलेटिक पटु सातारा जिल्हयाने दिलेले आहेत, त्यामुळे येथे खेलो इंडियाच्या माध्यमातुन सिंथेटिक ट्रॅक निर्माण करावा.

तसेच शाहु स्टेडियम येथे बास्केटबॉल पटुंसाठी इंडोअर बॉस्केटबॉल कोर्ट निर्माण करावे बास्केटबॉल मध्ये सातारच्या अर्णिका गुजर यांनी १२ वर्षे भारतीय संघात योगदान दिले तर ५ वर्षे नेतृत्व केले आहे. त्याचप्रमाणे काजल शानबाग, प्राची वेलनकर, प्रज्ञा माने, अर्णिका गुजर, यांना बास्केटबॉल मधील योगदानाबद्दल शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे बास्केटबॉल मध्ये नवीन खेळाडुंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी इंडोअर बास्केटबॉल कोर्ट खेलो इंडियाच्या माध्यमातुन निर्माण करावे.

सातारा जिल्हायामध्ये आर्चरी खेळाचा जोराने प्रचार आणि प्रसार होत आहे. आदिती स्वामी, ओजस देवताळे यांना २०२४ मधील आर्चरी मधील प्रविण्याबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कु.प्रविण जाधव, कु.पार्थ साळुंखे यांनीही आर्चरी खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  पातळीवर विशेष प्राविण्य मिळवले आहे. युवा पिढीची आर्चरी खेळामध्ये विशेष रुची निर्माण होण्यासाठी शासनाने स्थायी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, म्हणुनच सुयोग्य नियोजनाव्दारे आर्चरी खेळाचे मैदान आणि आर्चरी खेळाबाबतचे इतर सुविधा प्राधान्याने निर्माण करण्याबाबत पावले उचलावित इ. मागण्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केल्या असुन भारताचे क्रीडा, कामगार आणि रोजगार मंत्री ना. मनसुख मां‍डविया यांनी सकरात्मक प्रतिसाद दिला आहे. 

यावेळी काका धुमाळ, ॲड.विनीत पाटील, सागर राजेमहाडिक, करण यादव उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहा लाखाची लाच मागणार्‍या मुख्याधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
पणन मंत्र्यांनी मांडला महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याचा ठराव

संबंधित बातम्या