सातारा : सातारा शहरातील बँकेत कर्मचारी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी येथील एकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका बँकेत ३२ वर्षीय महिला नोकरीस आहे. हिंजवडी येथील एकाने महिलेचा पाठलाग करत बँकेच्या बाहेर आला. तेथून त्याने महिलेला फोन करत बाहेर भेटण्यासाठी बोलवत भेटण्यासाठी बोलावले,तू जर खाली आली नाहीस तर तुझ्या बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर तुझी इज्जत घालवत तुला बदनाम करून टाकीन अशी धमकी दिली.
त्यानंतर महिला खाली आल्यानंतर संशयितांने महिलेच्या हाताला धरून गाडीकडे ओढत नेले व तिला मिठी मारून गाडीत जबरदस्ती बसून लागला. यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले व स्वतःच्या मोबाईलवरून पिस्टलचे फोटो व्हाट्सअपला पाठवून जीवे मारण्याची व त्याने स्वतःच्या हातावर ब्लेड मारून स्वतःला जखमी करून महिलेवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणानंतर महिलेने कशीबशी सुटका करून घेत आरोपीच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करत आहेत.