कृष्णानगर येथे दुकान फोडून वीस लाखाचे नुकसान

by Team Satara Today | published on : 09 August 2025


सातारा : कृष्णानगर येथील शिवशक्ती स्टील ऍण्ड टिंबर्स व भैरव स्टील ऍण्ड टिंबर्स या दोन दुकानांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने आत घुसून दुकान फोडले. दोन्ही दुकानातील 1.90 लाख रुपये व 3 हजार रुपयांचे सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेले. तसेच दोन्ही दुकानातील 20 लाख रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार दि. 8 रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित कांतीलाल ओसवाल (वय 38, रा. कृष्णानगर, वनवासवाडी, खेड, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दीपक अँचलचंद जैन, ममता अँचलचंद जैन व साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार खाडे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी तीनजणांवर कारवाई
पुढील बातमी
अपघात प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या